गट ग्रामपंचायत महादुला अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिषजी जयस्वाल यांनी गट ग्रामपंचायत महादुला येथे सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धन व शाश्वत विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर शमशानभूमी महादुला येथील फळबाग परिसरात फडाच्या झाडाचे वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी जयसिंगजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय, सहाय्यक गटविकास अधिकारी बागडे सर, सरझाडे, गट ग्रामपंचायतीचे सरपंच शरद हेमराज दडुरे, उपसरपंच मनोज गायकवाड, पोलीस पाटील प्रदीप सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नलू ताई सिंधराम, ओमकारजी काटोके, माजी सरपंच सुखदेवजी काटोके, शेषरावजी रहाटे, अर्जुनजी खंडाते, सामाजिक कार्यकर्ता जयेंद्र कंगाली, गट ग्रामपंचायत सचिव डी. यू. ठवरे, रोजगार सेवक राजू कोकोडे, हिरामणजी सिनराम, बंडू टेकाम, नितेश मरस कोल्हे, आरोग्य अधिकारी मरकाम सर, सर्व आशा वर्कर्स, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे गावात पर्यावरणाबाबत जनजागृती होऊन वृक्षसंवर्धनाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.