गट ग्रामपंचायत महादूला अंतर्गत मौजा घोटी येथील जिल्हा परिषद शाळा, घोटी येथे शाळेच्या संरक्षण भिंतीला श्रमदानातून रंगरंगोटी करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरास आकर्षक व स्वच्छ स्वरूप प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी गट ग्रामपंचायत महादूलाचे सरपंच शरद हेमराज दडुरे, उपसरपंच मनोज गायकवाड, माजी सदस्य फत्तुजी मेंढे, बाळकृष्णजी सोनवणे, विष्णूजी गायकवाड, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक चव्हाण सर, शिक्षिका सोनम वाडीवे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर उपक्रमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत, शिक्षक व ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. अशा श्रमदानाच्या उपक्रमांमुळे सार्वजनिक मालमत्तेप्रती जबाबदारीची भावना वृद्धिंगत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Great content! Keep up the good work!