महादुला (प्रतिनिधी): गट ग्रामपंचायत महादुला येथे नुकतेच ग्रीन जिमचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत सचिव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावच्या सर्वांगीण विकासात नागरिकांचे आरोग्य हे महत्त्वाचे असल्याने ग्रीन जिमची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावकऱ्यांना व्यायामाची सुलभ सुविधा मिळणार असून निरोगी जीवनशैलीसाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.
लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि ग्रामस्थांनी याचा नियमितपणे लाभ घ्यावा असे आवाहन केले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या ग्रीन जिममुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.