ग्राम पंचायत महादुला Uncategorized मौजा घोटी येथील जिल्हा परिषद शाळेत संरक्षण भिंतीची श्रमदानातून रंगरंगोटी

मौजा घोटी येथील जिल्हा परिषद शाळेत संरक्षण भिंतीची श्रमदानातून रंगरंगोटी

गट ग्रामपंचायत महादूला अंतर्गत मौजा घोटी येथील जिल्हा परिषद शाळा, घोटी येथे शाळेच्या संरक्षण भिंतीला श्रमदानातून रंगरंगोटी करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरास आकर्षक व स्वच्छ स्वरूप प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी गट ग्रामपंचायत महादूलाचे सरपंच शरद हेमराज दडुरे, उपसरपंच मनोज गायकवाड, माजी सदस्य फत्तुजी मेंढे, बाळकृष्णजी सोनवणे, विष्णूजी गायकवाड, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक चव्हाण सर, शिक्षिका सोनम वाडीवे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर उपक्रमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत, शिक्षक व ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. अशा श्रमदानाच्या उपक्रमांमुळे सार्वजनिक मालमत्तेप्रती जबाबदारीची भावना वृद्धिंगत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

ग्रामपंचायत महादुला येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पणग्रामपंचायत महादुला येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण

महादुला : सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत महादुला येथे माननीय जिल्हाधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार व माननीय गटविकास अधिकारी यांनी भेट दिली. या दौऱ्यात स्वच्छता गाडीचे लोकार्पण, स्मशानभूमी विकासकामांचे

गट ग्रामपंचायत महादुला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांची भेटगट ग्रामपंचायत महादुला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांची भेट

गट ग्रामपंचायत महादुला अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिषजी जयस्वाल यांनी गट ग्रामपंचायत महादुला येथे सदिच्छा भेट दिली.