महादुला : सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत महादुला येथे माननीय जिल्हाधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार व माननीय गटविकास अधिकारी यांनी भेट दिली.
या दौऱ्यात स्वच्छता गाडीचे लोकार्पण, स्मशानभूमी विकासकामांचे उद्घाटन, पांदण रस्त्याचे लोकार्पण तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांमुळे ग्रामविकासाला चालना मिळून नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
