घोटी (प्रतिनिधी): गट ग्रामपंचायत महादुला अंतर्गत येणाऱ्या मोजा घोटी येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत पंधरवाडा कार्यक्रमाच्या अनुषंगाने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, नाल्यांची सफाई, कचरामुक्ती व जनजागृती करण्यात आली. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
या उपक्रमावेळी गट ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी असे उपक्रम नियमित राबवण्याची गरज व्यक्त केली.
स्वच्छता मोहिमेच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महादुला (प्रतिनिधी): गट ग्रामपंचायत महादुला येथे नुकतेच ग्रीन जिमचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत सचिव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या सर्वांगीण विकासात नागरिकांचे